Ad will apear here
Next
सखी सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन
पुणे : सखी या महिलांच्या ग्रुपने ‘सखी सौंदर्यवती’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १८ ते ६० वर्षे  वयोगटातील स्त्रियांना सहभागी होता येणार आहे. 

ही स्पर्धा इतर स्पर्धांप्रमाणे नसून, या स्पर्धेची संकल्पना वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मी काय करेन ? अशी आहे. यामध्ये स्पर्धकांचा पर्यावरण, प्रदूषण, निसर्ग समतोल या विषयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे व याकरिता त्यांनी सामाजिक स्तरावर काय प्रयत्न केले आहेत हे पाहिले जाईल. 

स्पर्धेत रँप वॉकसाठी संपूर्ण महाराष्ट्रीय पोशाख घालणे आवश्यक असेल. स्पर्धेत एकूण तीन फेऱ्या होतील. विवाहित महिला व मुली असे दोन गट असतील. या स्पर्धेतून तीन मुली व तीन महिला असे एकूण सहा विजेते काढले जातील.

नोंदणीकरिता संपर्क :
सायली स्वामी – ८४५९५ ६२५७१/९८५०७ ५९०२८ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZMDCB
Similar Posts
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
मॅक्सम्युलर भवनतर्फे पर्यावरण विषयावरील परिषद पुणे : ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनतर्फे आपल्या पाश प्रकल्पाअंतर्गत पुण्यात २३ ते २५ जून दरम्यान पर्यावरण आणि शाश्वतता या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १४ ते १६ वर्षे वयोगटातील ११० विद्यार्थी सहभागी होत आहेत. या परिषदेत पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक शाश्वातता या संकल्पनेवर चर्चा होणार आहे
पुण्यात सुरू आहे जागतिक गो-परिषद; देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचेही आयोजन पुणे : देशी गायींचे महत्त्व लक्षात येण्यासाठी आणि त्या संदर्भात जागृती करण्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंशाविषयीच्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने बालेवाडीतील मोझे महाविद्यालयाच्या मैदानावर
रॉयल हाइट्स सोसायटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प पुणे : सौरऊर्जेचे महत्त्व ओळखून, पर्यावरण रक्षणासाठी सजग असणाऱ्या बोपोडी येथील रॉयल हाइट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्या सोसायटीमध्ये ३२ किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language